कारण महाराज लढले तर फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी...





नमस्कार,
 आज ६ जून २०२०. सुमारे ३४६ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी स्वतःचा अभिषेक करवून घेतला आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि फक्त शपथच घेतली नाही तर त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावले. आज कोरोनाचं निमित्त नसतं तर रायगडावर मोठ्या थाटात हा उत्सव साजरा झाला असता. पण आपल्यातील बऱ्याच जणांना आपण हा दिवस आजही का साजरा करतो? असा प्रश्न पडला असावा. चला तर मग पाहुयात आपण आजही का हा उत्सव साजरा करतो.
 शिवाजी महाराजांनी जे वय आपण खेळण्यात घालवतो त्या वयात हिंदवी स्वराज्याचे धोरण आखले आणि १६व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. महाराजांच्या ह्या कार्याचे आपणास स्मरण व्हावे आणि सदैव प्रेरणा मिळत राहावी म्हणून आपण दरवर्षी हा दिवस साजरा करतो. पण प्रेरणा तर नक्की कसली प्रेरणा? आज तर देश स्वतंत्र आहे आणि परकीयांचे आक्रमणही नाही. असा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांच्या मनात निर्माण झाला असेलच.
 शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा सर्वप्रथम त्यांनी ह्या संपूर्ण समाजाला एकत्रित केले. पण दुर्दैवाने महाराजांनीच मिळवून दिलेल्या स्वराज्यात आज काही जण हेतुपुरस्सर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या हाती आपणास कोणतीही तलवार किंवा दांडपट्टा दिसणार नाही. करण त्यांच्या हाती असलेले एकमेव शस्त्र म्हणजे 'विचार'. आणि ह्या शत्रूवर जर मात करायची तर ती आपल्या राष्ट्रीयत्त्वाच्या विचारानेच करायला हवी. कारण आजची लढाई ही कोणत्या तलवार किंवा दांडपट्ट्याची नसून ती विचारांची आहे. आणि ह्या विचाररूपी लढाईला लागणारा गनिमी कावा म्हणजे 'एकता'. महाराज आपल्या मुखी आहेत, महाराज आपल्या हृदयी आहेत, आता वेळ आहे महाराजांना आपल्या कृतीत उतरवण्याची. कारण महाराज कधीच विशिष्ट जातीसाठी लढले नव्हते. ते लढले तर फक्त आणि फक्त ह्या हिंदवी स्वराज्यासाठी.

छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ह्या होळीला 'कोरोना'चे बळी होऊ नका !

टिळकांचा स्वदेशी विचार