Posts

'किस देश मे है मेरा दिल' ते 'छिछोरे' पर्यंतचा प्रवास

Image
'किस देश मे है मेरा दिल' ते 'छिछोरे' पर्यंतचा प्रवास :  २००८ मध्ये स्टार प्लस चॅनलवर लागणाऱ्या एका 'किस देश मे है मेरा दिल' नावाच्या एका मालिकेत आपण साईड ऍक्टरच्या भूमिकेत एका तरुण मुलाला पाहतो. त्यानंतर तोच मुलगा झी टीव्ही वर लागणाऱ्या 'पवित्र रिश्ता' नावाच्या एका प्रसिद्ध मालिकेत लीड ऍक्टर ची भूमिका साकारताना दिसतो. २००९ ते २०११ पर्यंत चाललेल्या ह्या सुप्रसिद्ध मालिकेतील ह्या मुलाचं काम पाहून आपल्याला तो आवडायला लागतो. मालिका संपल्यावर आपल्याला त्या मुलाचा विसर पडतो. पण अचानक २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काय पो चे' नावाच्या एका चित्रपटात हा मुलगा पुन्हा आपल्या नजरेस पडतो आणि पुन्हा आपल्या कलेने सर्वांच्या मनात आपलं स्थान प्रस्थापित करतो. ह्या रोल साठी 'फिल्मफेअर अवॉर्ड बेस्ट मेल डेबूट' पुरस्कारासाठी त्याचं नामांकन होतं. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमान्स', 'डिटेक्टिव्ह ब्योंकेश बक्षी', 'पी के' ह्या काही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना आपण ह्या मुलाला पाहत आलो. आता हा इथेच थांबत नाही तर हा चक्क जगप्रसिद्ध क्...

कारण महाराज लढले तर फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी...

Image
नमस्कार,  आज ६ जून २०२०. सुमारे ३४६ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी स्वतःचा अभिषेक करवून घेतला आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि फक्त शपथच घेतली नाही तर त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावले. आज कोरोनाचं निमित्त नसतं तर रायगडावर मोठ्या थाटात हा उत्सव साजरा झाला असता. पण आपल्यातील बऱ्याच जणांना आपण हा दिवस आजही का साजरा करतो? असा प्रश्न पडला असावा. चला तर मग पाहुयात आपण आजही का हा उत्सव साजरा करतो.  शिवाजी महाराजांनी जे वय आपण खेळण्यात घालवतो त्या वयात हिंदवी स्वराज्याचे धोरण आखले आणि १६व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. महाराजांच्या ह्या कार्याचे आपणास स्मरण व्हावे आणि सदैव प्रेरणा मिळत राहावी म्हणून आपण दरवर्षी हा दिवस साजरा करतो. पण प्रेरणा तर नक्की कसली प्रेरणा? आज तर देश स्वतंत्र आहे आणि परकीयांचे आक्रमणही नाही. असा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांच्या मनात निर्माण झाला असेलच.  शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा सर्वप्रथम त्यांनी ह्या संपूर्ण समाजाला एकत्रित केल...

टिळकांचा स्वदेशी विचार

Image
टिळकांचा स्वदेशी विचार :  आधुनिक हिंदुस्थानच्या उभारणीसाठी ज्या महापुरुषांनी आपले आयुष्य पणाला लावले त्या महापुरुषांमध्ये प्रामुख्याने मुखी येणारे नाव म्हणजे लोकमान्य टिळक. आपल्या देशाला ह्या ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ४ सूत्रे आखली. १. स्वराज्य २. स्वदेशी ३. बहिष्कार ४. राष्ट्रीय शिक्षण  टिळकांची ''स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" ही सिंहगर्जना आपल्याला सर्वांना माहीतच आहे. भारताला स्वराज्य बनवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. टिळकांच्या ह्या संघर्षामुळे ब्रिटिश सरकारला त्यांना अटक करावी लागली. परंतु थांबतील ते टिळक कसले. कारावास पूर्ण झाल्यावर परत त्यांनी 'पुनश्च हरिओम' नावाचा अग्रलेख लिहून आपला संघर्ष सुरू ठेवला.  मात्र स्वराज्यनिर्माण करत असता दुसरा महत्त्वाचा विचार टिळकांनी मांडला तो म्हणजे स्वदेशीचा. आपल्या देशाला जर स्वराज्य अर्थात स्वकीयांचं राज्य जर बनवायचं असेल तर आपल्याला स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म हे विसरून चालणार नाही हे टिळकांनी स्पष्ट केले. भारताला जर स्वराज्य बनवायचं तर विदेशी वस्तूंव...

मॅगी

Image
शनिवारचा दिवस होता. तसा विकेंडच होता. पण ऑफिस मधल्या कामाचं प्रेशरच इतकं.. कसल्या वीकएंड व्हाईब्स आणि कसलं काय. आधीच २ दिवस हिचं देवदर्शन देवदर्शन कधीपासून चालू होतं म्हणून घेतल्या २ दिवस सुट्ट्या. त्यामुळे बॉसने सुद्धा चांगलाच पिळून काढला होता शनिवारचा. घरी पोहोचायलाच रात्रीचे २ वाजले. त्यात आमच्या होम मिनिस्टर माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे माझी जेवणाची व्यवस्था सुद्धा नव्हती. बाहेर जावं तर दुकानं हॉटेलं सगळं बंद आणि घरी बसावं तर स्वीग्गी झोमॅटो सुद्धा बंद. भूक तर सडकून लागली होती. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी घरी बसून तर पर्याय नव्हता. मग काय काढली बाईक आणि निघालो बाहेर अन्नाच्या शोधात. एक २४ तास उघडं मेडिकल रस्त्यात लागलं. म्हटलं बघू इकडे तरी काय मिळतं का. मेडिकलच्या काउंटर वर उभाच होतो. मेडिकल वाल्या काकांना विचारणार तितक्यात नजर समोरच्या रॅककडे वळली. रॅक मध्ये असलेली मॅगी मला तिकडे दिसली. मॅगी पाहताच आनंद होऊन डोळ्यांत पाणी आलं. आनंद खायला मिळालं काहीतरी याचा होताच पण आनंदाश्रू मात्र मॅगी सोबत आलेल्या त्या माझ्या भावाच्या आठवणीने आले. लगेच मी मॅगी उचलली बिल पे केलं आ...

ह्या होळीला 'कोरोना'चे बळी होऊ नका !

 होळी म्हणजे भारतातील आबालवृद्धजनांना प्रिय असणारा एक सण. लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. एका पौराणिक कथेनुसार विष्णूचा भक्त प्रल्हाद ह्याला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने धाडलेली स्त्री होलिका हिचा श्रीविष्णूने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. तसेच काही विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर हा सण मुळात लौकिक पातळीवरचा आहे असे लक्षात येते असे काही विद्वानांचे मत आहे.   होळी हा सण फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुनी पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस साजरा केला जातो. ह्या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून रात्री होळी जाळून होलिकोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वत्र धुळवडीचा कार्यक्रम ...