'किस देश मे है मेरा दिल' ते 'छिछोरे' पर्यंतचा प्रवास
'किस देश मे है मेरा दिल' ते 'छिछोरे' पर्यंतचा प्रवास : २००८ मध्ये स्टार प्लस चॅनलवर लागणाऱ्या एका 'किस देश मे है मेरा दिल' नावाच्या एका मालिकेत आपण साईड ऍक्टरच्या भूमिकेत एका तरुण मुलाला पाहतो. त्यानंतर तोच मुलगा झी टीव्ही वर लागणाऱ्या 'पवित्र रिश्ता' नावाच्या एका प्रसिद्ध मालिकेत लीड ऍक्टर ची भूमिका साकारताना दिसतो. २००९ ते २०११ पर्यंत चाललेल्या ह्या सुप्रसिद्ध मालिकेतील ह्या मुलाचं काम पाहून आपल्याला तो आवडायला लागतो. मालिका संपल्यावर आपल्याला त्या मुलाचा विसर पडतो. पण अचानक २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काय पो चे' नावाच्या एका चित्रपटात हा मुलगा पुन्हा आपल्या नजरेस पडतो आणि पुन्हा आपल्या कलेने सर्वांच्या मनात आपलं स्थान प्रस्थापित करतो. ह्या रोल साठी 'फिल्मफेअर अवॉर्ड बेस्ट मेल डेबूट' पुरस्कारासाठी त्याचं नामांकन होतं. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमान्स', 'डिटेक्टिव्ह ब्योंकेश बक्षी', 'पी के' ह्या काही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना आपण ह्या मुलाला पाहत आलो. आता हा इथेच थांबत नाही तर हा चक्क जगप्रसिद्ध क्...