ह्या होळीला 'कोरोना'चे बळी होऊ नका !

 होळी म्हणजे भारतातील आबालवृद्धजनांना प्रिय असणारा एक सण. लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. एका पौराणिक कथेनुसार विष्णूचा भक्त प्रल्हाद ह्याला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने धाडलेली स्त्री होलिका हिचा श्रीविष्णूने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. तसेच काही विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर हा सण मुळात लौकिक पातळीवरचा आहे असे लक्षात येते असे काही विद्वानांचे मत आहे.
  होळी हा सण फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुनी पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस साजरा केला जातो. ह्या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून रात्री होळी जाळून होलिकोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वत्र धुळवडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. विविध प्रकारच्या रंगांनी एकमेकांना रंगवून हा कार्यक्रम साजरा केला जातो. भारतात मोठ्या प्रमाणात अगदी लहान मुलांपासून वृद्ध जनांपर्यंत सर्व जण धुळवडीचा कार्यक्रम आनंदाने साजरा करतात. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून परस्परांमध्ये असलेले प्रेम वाढून नाती व संबंध अधिक घट्ट होतात. बरीच लहान मुले रंगाचे पाणी तयार करून पिचकारी मध्ये रंग भारतात आणि एकमेकांवर उडवतात. काही जण फुग्यांमध्ये रंगाचे पाणी भरुन एकमेकांच्या अंगावर फुगे फोडून आनंद साजरा करतात. रंगांचा सण म्हणून मोठ्या प्रमाणात हा सण ओळखला जातो. लावण्यात येणाऱ्या रंगात काही प्रमाणात केमिकलचा समावेश असतो. ह्या केमिकलयुक्त रांगामुळे त्रास होऊ नये ह्यासाठी विविध प्रकारचे नैसर्गिक रंग तयार केले जातात.
 मात्र सध्या चीनमध्ये कोरोना नामक  एक भयंकर व्हायरस पसरत आहे. चीनमध्ये निर्माण झालेला हा कोरोना व्हायरस भारतासह अनेक देश देशांमध्ये पसरत चालला आहे. भारतासह अमेरिका, थायलंड, जपान, तिबेट, मंगोलिया असे सर्व देश ह्या व्हायरसचे बळी पडत आहेत. चीनमध्ये देखील रंग, पिचकारी, फुगे ह्या वस्तूंची निर्मिती केली जाते. किंमतीच्या दृष्टीने ह्या वस्तू स्वस्त असल्याने व्यापारी धुळवडीकरिता चीन वरून सुद्धा मोठया प्रमाणात पिचकारी, फुगे, रंग या वस्तूंची आयात करतात. तसेच भारतीय लोक देखील पिचकारी, रंग, फुगे इत्यादी गोष्टी स्वस्त मिळाव्यात म्हणून मोठ्या प्रमाणात "मेड इन चायना" वस्तू विकत घेतात.  अश्यावेळी चीन मधून तयार होऊन आलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.
 चीन मधील ह्या कोरोना व्हायरसमुळे आपला जीव धोक्यात जाऊ नये म्हणून आपण सर्वजण फक्त भारतात निर्माण झालेल्या वस्तूंची खरेदी करूया. तसेच सर्व व्यापारी वर्गासही भारतीय वस्तूंचीच जास्तीत जास्त विक्री करण्यास प्रोत्साहन करूया. ह्यामुळे चिनी कोरोना व्हायरसपासून आपलं संरक्षण तर होईलच पण त्याचप्रमाणे भारतातील औद्योगिक क्षेत्रात विकास होण्यास मदत होऊ शकते. 
                       - अंकित आंबवणे, पनवेल.
                          ambavane.ankit108@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कारण महाराज लढले तर फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी...

टिळकांचा स्वदेशी विचार