टिळकांचा स्वदेशी विचार
टिळकांचा स्वदेशी विचार : आधुनिक हिंदुस्थानच्या उभारणीसाठी ज्या महापुरुषांनी आपले आयुष्य पणाला लावले त्या महापुरुषांमध्ये प्रामुख्याने मुखी येणारे नाव म्हणजे लोकमान्य टिळक. आपल्या देशाला ह्या ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ४ सूत्रे आखली. १. स्वराज्य २. स्वदेशी ३. बहिष्कार ४. राष्ट्रीय शिक्षण टिळकांची ''स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" ही सिंहगर्जना आपल्याला सर्वांना माहीतच आहे. भारताला स्वराज्य बनवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. टिळकांच्या ह्या संघर्षामुळे ब्रिटिश सरकारला त्यांना अटक करावी लागली. परंतु थांबतील ते टिळक कसले. कारावास पूर्ण झाल्यावर परत त्यांनी 'पुनश्च हरिओम' नावाचा अग्रलेख लिहून आपला संघर्ष सुरू ठेवला. मात्र स्वराज्यनिर्माण करत असता दुसरा महत्त्वाचा विचार टिळकांनी मांडला तो म्हणजे स्वदेशीचा. आपल्या देशाला जर स्वराज्य अर्थात स्वकीयांचं राज्य जर बनवायचं असेल तर आपल्याला स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म हे विसरून चालणार नाही हे टिळकांनी स्पष्ट केले. भारताला जर स्वराज्य बनवायचं तर विदेशी वस्तूंव...